Posts

बहुभाषिक अध्ययन अध्यापन करतांना विद्यार्थी/शिक्षकांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय.

बहुभाषिक अध्ययन अध्यापनातील समस्या व उपाय.
         बहुभाषिक विद्यार्थ्यांना अध्यापन करतांना शिक्षकांना व अध्ययन करतांना विद्यार्थ्यांना अनेक समस्या येतात त्या कशा सोडवता येतील यासाठी त्या नेमक्या समस्या काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. या समस्यांची आपण दोन गटात विभागणी करूया.
१) विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या.
२)शिक्षकांना येणाऱ्या समस्या.
          ✓ विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या.
बहुभाषिक/बोलीभाषिक विद्यार्थी जेंव्हा पूर्वप्राथमिक/प्राथमिक शाळेत दाखल होतो तेव्हा त्याला शाळेत समायोजित होण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या काही भाषिक अडचणी येतात त्या पुढील प्रमाणे.
१)शाळेतील शिक्षक काय बोलतो हे त्याला समाज नाही.
२)शाळेतील भाषिक वातावरण व घराचे भाषिक वातावरण खूप भिन्न असते.
३)शाळेतील इतर विद्यार्थी काय बोलतात हे समजत नाही.
४)शालेय पुस्तकातील संदर्भ व परिसरातील सदर्भ जुळत नसल्याने संकल्पना स्पष्ट होण्यास अडचण जाते.
५) स्वभाषेतील उच्चार व शाळेतील भाषेचे उच्चार यामध्ये भिन्नता असल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात.
      या व अशा अनेक अडचणी बहुभाषिक परिस्तीतील विद्यार्थी श…

ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचे महत्त्व.

Image
ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचे महत्त्व...
       मातृभाषा ही शिक्षणाचे माध्यम असावे असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. अर्थातच ज्ञानार्जनासाठी मातृभाषा ही खूप महत्त्वाची ठरते.
       शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना हा अनुभव अनेकदा येतो. मातृभाषे व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत सांगितलेली गोष्ट एवढ्या लवकर लक्षात येते नाही ती मातृभाषेतून अगदी चटकन लक्षात येते. जरी मला इंग्रजी/हिंदी खूप चांगली येत असली तरी या भाषांतून सांगितलेली गोष्ट एवढ्या लवकर लक्षात येणार नाही. पण तीच गोष्ट मला जर मराठीतून सांगितली तर खूप चांगली व लवकर समजते हा माझा स्वतःचा अनुभव आहे.आणि जर शिक्षणाचा मूळ उद्देश ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, रसास्वाद, नवनिर्मिती व जीवनाचा आनंद घेणे असेल तर या प्रत्येक पायरीवर सहज रित्या आपणास व विद्यार्थ्यास पुढे न्यायचे असेल तर प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन विचार केल्यास आपल्या लक्षात की मातृभाषाच आपल्याला या सर्व पातळ्यांवर सहज नेऊ शकते. कारण प्रत्येकाची विचारप्रक्रिया ही त्याच्या मातृभाषेतून चालते.
       जेव्हा १ ल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला "इकडे ये" असे म्हणतो त्…

My Introduction

Image
नाव:- प्रदिप गणपतराव जाधव
पद:- सहाय्यक शिक्षक, जि प शाळा गाव पोड शिवणी, ता. घाटंजी जि. यवतमाळ.
सेवा:- १००% कोलाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत १०वर्ष सेवा.
कार्य:-
१)आदिवासी विद्यार्थ्यां साठी उपक्रम ' बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे '.
२)कोलामी आदिवासी बोलीभाषेत शब्दकोष निर्मिती.
३)गाणे, गोष्टी, कविता यांचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोलामी भाषेत भाषांतर.
४) शाळेतील कोलामी बोलीभाषेचे शैक्षणिक साहित्य ' बहुभाषिक अध्ययन अध्यापन' या SCERT, पुणे ने तयार केलेल्या शिक्षक हस्त्पुस्तिकेत प्रसिध्द.
५)२०१६ च्या पहिल्या शिक्षणाची वारी मध्ये बोलीभाषा विषयी स्टॉल.
६) राज्यस्तरीय बोलीभाषा सुलभक.
७) राज्यस्तरीय इंग्रजी भाषा सुलभक.
८) शाळेत सुंदर बागेची निर्मती.
९)भाषेविषयी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभाग.
१०)शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न.
१२)बोलीभाषा जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यभर अभ्यास दौरा करून शाळेत १६ आदिवासी बोलीभाषेचे साहित्य एकत्रित केले.
लवकरच हे सर्व साहित्य जगभरातील शिक्षक विद्यार्थी व भाषा अभ्यासक यांचेसाठी एका संकेतस्थळावर प्र…

इंग्रजी भाषेचे महत्त्व (बहुभाषिक अध्ययन अध्यापन या संदर्भात)

Image
इंग्रजी भाषेचे महत्त्व व बहुभाषिक अध्ययन अध्यापन
      भारतात इंग्रजी मातृभाषा असणारे लोक खूप कमी प्रमाणात आहेत. परंतु जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत असलेले इंग्रजीचे महत्त्व पाहता आज इंग्रजी ही ज्ञानभाषा व संभाषण भाषा बनली आहे. व इंग्रजी भाषा शिकणे काळाची गरज झाली आहे.
      भारतीय परिस्थिती लक्षात घेता ९०% पेक्षा जास्त लोकांची इंग्रजी मातृभाषा नाही. परंतु इंग्रजी शिकण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असे मुळीच नाही. सर्वप्रथम विद्यार्थ्याने एक भाषा म्हणजे त्याची मातृभाषा ती कुठलीही असो ती योग्य रित्या आत्मसात करावी असे शिक्षण तज्ञांचे मत आहे व ते १००% संशोधन करून त्यांनी मांडले आहे.
      जर वरील मत योग्य असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा योग्य रित्या आत्मसात करण्यास सहाय्य करणे हे त्याच्या पालकाची व शिक्षकाची जबाबदारी आहे. आता विद्यार्थ्याची मातृभाषा हीच जर शिक्षणाचे माध्यम असेल तर इथे हा प्रश्नच येत नाही किंवा त्याला अशा परिस्थितीत त्याची मातृभाषा योग्य रित्या आत्मसात करता येते. परंतु त्या विद्यार्थ्यांचे काय ज्यांची मातृभाषा हे त्याच्या शिक्षणाचे माध्यम नाही...…

काही बोलीभाषा व बोलीभाषिक विद्यार्थी

Image
काही बोलीभाषा व बोलीभाषिक विद्यार्थी           एका आकडेवारी नुसार भारतात एकूण ७५० बोलीभाषा बोलल्या जातात. भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला असता बोलीभाषा म्हणजे अशा भाषा ज्यांना लिपी नाही त्या फक्त बोलल्या जातात त्यामुळे या बोलीभाषा मध्ये लेखी साहित्य हे दुर्मिळ आहे. परंतु प्रत्येक बोलीभाषेत मोठ्या प्रमाणावर पारंपरिक साहित्य त्या बोली भाषिक व्यक्तींकडे आहे. हे साहित्य व बोलीभाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे पारंपरिक साहित्य लीपिबद्ध व ध्वनिमुद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे दुहेरी फायदे होतील एकतर या बोली भाषांचे जातं व संवर्धन होण्यास मदत होईल व हे साहित्य या बोलीभाषा ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा आहे त्यांना लेखन वाचन शिकवण्यासाठी त्या त्या शाळेवर कार्यरत शिक्षकांना या साहित्याचा वापर करता येईल.
      महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातही अनेक बोलीभाषा बोलल्या जातात या बोलीभाषा पैकी १८ अशा बोलीभाषा आहेत की ज्या त्या त्या विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. व या बोली भाषिक विद्यार्थ्यांना शिकवताना मराठी भाषिक शिक्षकाला काही विशेष प्रयत्न करणे गर…

जागतिकीकरणात बहुभाषिकत्वाचे स्थान

Image
      जागतिकीकरणात बहुभाषिकत्वाचे स्थान
आज जग जवळ आलं आहे आणि जगात अनेक भाषा बोलल्या जातात, ज्या व्यक्तीला अनेक भाषा जाणतो तो व्यक्ती जगातील अधिकात अधिक ज्ञान प्राप्त करून ते इतरांनी देऊ शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ज्या देशात त्या कंपनीची शाखा आहे तेथील स्थानिक भाषा अवगत करावी लागते, तेच सरकारी नोकरी साठी पण लागू पडते जेथे कोठे (राज्यात/देशात) नोकरी करायची आहे तेथील स्थानिक भाषा त्या अधिकारी/कर्मचाऱ्याला अवगत करावी लागते.
       वेगवेगळ्या भाषा आत्मसात करणे त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे काम शालेय जीवनापसूनच झाले तर किती महत्वाची बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वृद्धिंगत झालेली आपणास दिसून येईल.
[(आम्ही करत असलेल्या बहुभाषिक अध्ययन अध्यापन कार्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.. https://youtu.be/EoFTyCgrcMk )]
        एक करीयर म्हणून देखील बहुभाषिकत्वाकडे आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी दुभाषी, भाषांतरकार, टुरिस्ट गाईड या व अशा अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भाषा आत्मसात करण्याची कौशल्य ज…

एकाच भाषेच्या वेगवेगळ्या बोली भाषा..

Image
https://youtu.be/8nZn1WH6b5E
         भारतात नुसत्या अनेक भाषा आहेत असे नाही तर एका भाषेच्या अनेक बोलीभाषा देखील आहेत, आणि प्रत्येक बोलीभाषा आपला स्वतंत्र असा लहजा व शब्दकोश यासह समृध्द आहे.
         उदाहरणच द्यायचं झालं तर मराठी कोकणात वेगळी, विदर्भात वेगळी तर मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते.            मराठवाड्यातील 'उभा ठाक' हा शब्दप्रयोग कोकण व विदर्भातील व्यक्तीला समजेलच असे नाही. मराठवाड्यातील एका वर्गमित्राने हा शब्द डी एड प्रथम वर्षामध्ये सूक्ष्म पाठ घेतांना हा शब्दप्रयोग केला व तो आम्हाला समाजाला नाही आम्ही सर्व त्याच्याकडे पाहत राहिलो तो परत परत तो शब्दप्रयोग करू लागला परंतु तो आम्हाला कळायला मार्ग नव्हता त्याचे म्हणणे होते ' उभा रहा' !!
जर वयाच्या १९ व्या वर्षी आम्हाला मराठीतला एक वेगळा शब्द समजत नव्हता तर....
      वेगळी भाषा असलेल्या १ल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्याला एका एकदम वेगळ्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करत असताना त्या विद्यार्थ्याला किती समजेल व तो कसा शाळेत शिकता होईल याची कल्पना आपण करू शकतो.
       यासाठी बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी…